धाराशिव (प्रतिनिधी)-  शहरात ईद-ए-मिलाद पैगंबर जयंतीनिमित्त ताज चौक या ठिकाणी दि.19 सप्टेंबर रोजी एसीएम ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. सह्याद्री ब्लड बँकेने रक्तदात्यांचे रक्त संकलित केले. मागील वर्षी एसीएम ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. त्यावेळी 230 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी 230 पेक्षा जास्त रक्तदात्यांनी नोंदणी केली आहे. सात वाजेपर्यंत ती पूर्ण होईल अशी प्रतिक्रिया एसीएम ग्रुपचे अध्यक्ष अझर मुजावर व सचिव जफर शेख यांनी दिली आहे. 

उपविभागीय पोलीस अधिकारी धाराशिव राठोड व शहर पोलीस निरीक्षक शेख यांनीही सदर शिबिरास सदिच्छा भेट दिली. एसीएम ग्रुपचे कार्याचा कौतुक केले. एसीएम ग्रुपच्या वतीने उत्कृष्टरित्या रक्तदान शिबिर घेण्यात आल्यामुळे जुलूस कमिटीच्या वतीने एसीएम ग्रुपच्या सचिव जफर शेख यांना सन्मानचित्र देऊन सन्मानित करण्यात आला. यावेळी जमीर शेख, पोपट करवार, सलीम पठाण, सादिक मुजावर, अझहर काझी, ईल्यास मुजवार, अरिफ मुजावर,  दिलनावाज तांबोळी, माजीद सय्यद, रहेमत शेख, अयुब शेख, जलील शेख, रेहान मुजावर व सह्याद्री ब्लड बँकेचे सहकारी उपस्थित होते.

 
Top