धाराशिव (प्रतिनिधी)- गवळी गल्लीतील श्री बाल हनुमान गणेश मंडळ, मानाचा गणपती व धाराशिवचा महाराजा म्हणून गणल्या गेलेल्या  मंडळाच्या वतीने गेली अनेक वर्षापासून गणेशोत्सवाच्या या कालावधीमध्ये एक पूर्ण दिवस महिला कर्तृत्व सन्मान दिन उत्साह पूर्ण साजरा. महिलानी त्यांच्याच व विविध क्षेत्रातील कौतुकास्पद व गौरवशाली या कार्याचा सन्मान व सत्कार केला जातो.

 महिलांच्या माऊली व भगिनी भजनी मंडळाने भक्ती गीते, भावगीते, गवळणी सतत चार तासाचा कार्यक्रम सादर केला. महिलांच्या कडून श्री च्या चरणी अथर्वशीर्ष पठण  ,पंधरावा गीता अध्याय पठण, महाचंडिका स्तोत्र इ अकरा वेळेस व एक वेळेस फलश्रुती म्हणून भक्तीमय वातावरणात श्री चरणी अर्पण केली. यावेळी श्री च्या समोरील पूर्ण मोकळे मैदान महिलांनी गर्दीने भरलेले होते. मंडळाने यावर्षीचा देखावा कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नका. गर्वाचे घर खाली होते हा हलता देखावा हिरण्यकशुपाचा वध व नरसिंह अवतारात प्रगटीकरण दाखवण्याचा प्रयत्न करून भक्त प्रल्हादाची भक्तीची महिमा, व विजय.  हिरणकश्यपचा गर्वहरण हलता देखाव्यातून संदेश दिला.  जिल्हाधिकारी ओंबासे यांच्या शुभहस्ते अश्विनी नाग टिळक महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत पास होऊन पोलीस निरीक्षक या पदावर निवड झाल्याबद्दल जिल्हा धाराशिवचे प्रमुख अनिकेत साबळे, बालाजी कदम महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा पासून पोलीस निरीक्षकाच्या पदावर निवडीबद्दल. किरण धनवडे जलसंपदा कार्यालयात इंजिनीयर म्हणून निवडीबद्दल रंजीत रणजीत रणदिवे अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या साहित्यिक निर्मितीत सुरुवात केलेली व शिदोरी नावाच्या या कादंबरीच्या लिखाणासाठी. अमेरिकेतील व्हेरी नाईस विद्यापीठ शिकागो येथून मास्टर इन कॉम्प्युटर सायन्स पदवी घेत असलेले जानवी कथले. समाजसेविका म्हणून कार्यरत असलेल्या पुष्पा शिंदे, उल्का मुर्गे, चौगुले महिलांच्या सुप्त कला गुणाला विकसित करण्यासाठी व महिलांच्या सक्षमीकरण व सबलीकरणासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले गेले होते. चित्रकला, नृत्यकला, वेशभूषा, उखाणे, समूहनृत्य  सूप नृत्य विविध विजेते  सर्वांचा सन्मान पारितोषिक देऊन करण्यात आला. सन्मान शेला सन्मानचिन्ह व श्री ची प्रतिमा असलेले देऊन प्रतिमा देऊन करण्यात आला. 

ओंबासे यांच्या शुभहस्ते श्री ची पूजा विधि अत्यंत शुद्ध मंत्र उच्चार व गणपती आरती  ,दुर्गा आरती  महादेव आरती, जय जगदीश आरती इत्यादी काशिनाथ दिवटे यांच्या सुरेख, सुंदर, मंजूळआवाजात व भक्तिमय वातावरणात ,घंटा नाद ढोल ,ताशा, हलगी या वाद्य निनादात कुणाल दिवटे, विद्या साखरे व कांबळे यांच्या वाद्य वाजविण्यामुळे प्रसन्नमय  वातावरणात पूजा करण्यात आली. मंडळाच्या वतीने महिषासुर स्तोत्र वलगुड येथील आलेल्या सर्व मुलींचा सन्मान. आयुर्वेदिक महाविद्यालयातील श्रीमती भोसले व त्यांचे आयुर्वेदिक विद्यार्थी यांनी नेत्रदान ,अवयव दान, रक्तदान, वृक्षारोपण व विविध रोगाविषयी सामान्य माणसांच्या जनजागृतीसाठी व प्रबोधनासाठी कार्य केलेल्या बद्दल यांचाही सन्मान.  महिलांनी या पूजा विधी मध्ये आपली भक्ती अर्पण केली. मंडळाचे लहान मोठे सर्व कार्यकर्ते मनमत अप्पा पाळणे, प्रा गजानन गवळी ,संजय पाळणे, डॉ अजित नायगावकर, नंदकुमार हुच्चे, विश्वास दळवी  वरून साळुंखे, सालपे बंधू  केदार उपाध्ये, मनोज अंजीखाने  दुर्गेश दिवटे, अतुल ढोकर ,गिरीश, बसवेश्वर, सागर पाळणे ,श्रीकांत दिवटे ,रणजीत बुरुंग ,अश्विन हंचाटे व महिलांच्या कडून निर्मला गवळी, उज्वला दिवटे, अलका गवळी, अनुराधा पाळणे, सुरेखा, पुष्पा हुच्चे, कल्याणी उपाध्ये ,वैभवी साखरे ,भोपालकर , तोडकरी, खांडेकर, इत्यादी महिलांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा भालचंद्र हुच्चे यांनी केले व राजकुमार दिवटे यांनी आभार माणले. शोभेची दारू व फटाक्याच्या आत्ताशीबाजी मध्ये समारोप करण्यात आला. सर्वांना तीर्थप्रसाद वाटप करण्यात आले भक्तगणांनी संकल्प व नवस श्रीच्या आशीर्वादाने पूर्ण झाल्यामुळे प्रसाद देण्याची रेलचेल दिसून आली.

 
Top