तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील मंकावती गल्लीतील भागातील विनायक बाबुराव साळुंखे यांचे जुने राहतें घराची भित राञी नऊच्या सुमारास पडली. राञी घर पडल्याने जीवीत हानी झाली नाही. या घटनेने जुने घरांच्या भिंती प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हे घर पुरातन असून त्याच्या भिंती चार ते पाच फुटांच्या आहेत. सर्व बांधकाम दगड आणि मातीमध्ये झालेले असून भिंतीत पावसाचे पाणी मुरत गेल्यामुळे दिनांक 6 सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास घराची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. दोन मजली घर असून सर्व माळवदाची घर आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे.