तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मंदीर परिसरात असणाऱ्या रणसम्राट गणेश मंडळाच्या श्रीगणेश मुर्तीची आरती शनिवार दि. 7 सप्टेंबर रोजी स्थानिक पत्रकारांच्या शुभहस्ते करण्यात आली.

यावेळी धाराशिव जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत कदम, प्रदीप  अमृतराव, सचिन ताकमोघे, नंदकुमार नाईकवाडी सह अध्यक्ष शुभम क्षिरसागर, दत्ता क्षिरसागर, प्रथमेश सोंजी, समर्थ रोचकरी, अक्षय करडे, कृष्णा शिंदे, अभिषेक छत्रे, अमोल शिंदे, आलोक शिंदे, शितल अमृतराव सह मंडळाचे पदाधिकारी उपस्थितीत होते.  

 
Top