धाराशिव (प्रतिनिधी)- पोलीस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या आदेशावरुन शनिवारी दि.07.09.2024 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 28 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा सुमारे 940 लि. द्रवपदार्थ नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट करण्यात आला तर सुमारे 730 लि. गावठी दारु,  सुमारे 430 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव व देशी- विदेशी दारुच्या एकुण 575 बाटल्या असे मद्य जप्त केले. ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थ व जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 7 लाख 17 हजार 575 रूपये आहे. यावरुन 28 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 28 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


 
Top