परंडा (प्रतिनिधी) येथील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सहसचिव तथा अनुदुर तालुका तूळजापूर जिल्हा धाराशिव येथील ज्येष्ठ समाजसेवक आर एस गायकवाड यांना नुकताच डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय सेवा रत्न पुरस्कार प्राप्त झाला.त्यांनी गेल्या 30-35 वर्षांमध्ये विद्यार्थी चळवळीपासून ते शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रात अनमोल असे कार्य करून जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यामध्ये आपल्या कारकिर्दीमुळे सर्वांच्या परिचयाचे आहेत. 

   गायकवाड यांनी अनेक चळवळीमध्ये, नामांतर लढ्यामध्ये खूप मोठी कामगिरी बजावली आहे.  त्यांच्या कार्याची दखल घेत सहारा चारिटेबल ट्रस्ट या राष्ट्रीय संस्थेने आर एस गायकवाड यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय सेवा रत्न पुरस्कार प्रदान केला आहे.या पुरस्काराचे वितरण वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण शिंदे , फुले आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक डॉ शहाजी चंदनशिवे , वंचित बहुजन आघाडीचे धाराशिव जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के, बाबासाहेब जानराव, जिल्हा सहसचिव मोहन दादा बनसोडे ,महाराष्ट्र पोलीस टाईम चे संपादक उमेश काळे ,युनुस पटेल , बाबुराव गायकवाड उमरगा, नामदेव वाघमारे , विद्यानंद वाघमारे , बाबासाहेब वाघमारे, वंचित बहुजन आघाडीचे परांडा तालुका उपाध्यक्ष मधुकर सुरवसे, परंडा तालुका सहसचिव राहुल पवार या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या पुरस्काराचे वितरण करण्यात आले . यावेळी धाराशिव जिल्ह्यातील अनेक मित्रपरिवार कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

यावेळी फुले शाहू आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक डॉ शहाजी चंदनशिवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले . ते आपल्या मनोगतात म्हणाले की आर एस गायकवाड हे एक समाजसेवेने झपाटलेले व्यक्तिमत्व असून त्यांनी बहुजन समाजासाठी विविध क्षेत्रामध्ये फार मोठे योगदान दिले आहे . त्यांच्या नोकरीच्या सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे . तेव्हा समाजाला ते एक आदर्श ठरले असून समाजातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्यांचा आदर्श घेऊन समाज हिताचे प्रमाणिक काम करावे . शेवटी जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के यांनी सर्वांचे आभार मानले .आर एस गायकवाड यांना मिळालेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय सेवा रत्न पुरस्कारामुळे त्यांच्या मित्र परिवारांनी आप्तेष्टांनी अभिनंदन व कौतुक केले.

 
Top