धाराशिव (प्रतिनिधी)-येथील आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक गुरुवर्य के. टी. पाटील सर यांच्या जयंतीनिमित्त आदर्श संस्थेच्या वतीने 3 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर हा सप्ताह विविध समाजोपयोगी कार्यक्रमाने साजरा करण्यात येणार आहे.
या सप्ताहांतर्गत आज मोफत सर्व शरीराची तपासणी व रक्तदान शिबिर या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले .
या सभारंभाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी केले , यावेळी त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, बप्पांच्या दूरदृष्टी व कार्य कर्तृत्वामुळे मराठवाड्या सारख्या मागासलेल्या भागातील धाराशिव जिल्हयाचा शैक्षणिक व सामाजिक विकास झाला, असे त्यांनी सांगितले.या शिबीरामध्ये शेकडो नागरिक व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले तर सर्वरोगनिदान व उपचार करून घेतला.
या वेळी संस्थेच्या सचिव प्रेमाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, प्रशासकीय अधिकारी साहेबराव देशमुख, संस्था सदस्य संतोष कुलकर्णी व प्रशालेचे प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपप्राचार्य संतोष घार्गे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक यशवंत इंगळे, श्रीमती बी.बी गुंड ,राजेंद्र जाधव, धनंजय देशमुख, निखील कुमार गोरे व सुनील कोरडे तसेच आदर्श परिवारातील सर्व शाखेचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.