धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्हयात मागील तीन दिवसापासून पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे पंतप्रधान पीक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे. त्याच्यासाठी 72 तास किंवा तीन दिवसाचा आत विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी. असे आवाहन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे यांनी केले आहे. 

कोळगे यांनी म्हटले आहे की, ज्या शेतकऱ्यांचे  सोयाबीन तुर मुग उडीद कापुस इत्यादी पिकाचे नुकसान किंवा वाहुन गेले आहे. पिकात पाणी साचले किंवा अती पावसामुळे पिकाची नासाडी झाली आहे. अशा शेतकऱ्यांनी  तातडीने तक्रार दाखल करावी जेणेकरून पीक विमा मिळणे सोईचे होईल. तसेच ज्या शेतकऱ्यानी ई पीक पहाणी केली नाही त्यांनी  ती तात्काळ  करून घ्यावी, असे आवाहन कोळगे यांनी केले आहे.

 
Top