भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील श्रीक्षेत्र सामनगाव (जुने) येथे श्री सद्गुरु दास महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ संगीत गाथा पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सलग 11 वर्षांपासून या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. हभप धर्मराज महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताह सोहळ्यास शुक्रवारी (दि.13) प्रारंभ होणार आहे तर सांगता शुक्रवारी (दि.20) होणार आहे. शुक्रवारी सकाळी हभप बन्सी महाराज काळे भूम, रात्री हभप संतोष महाराज माने हिंगोली, शनिवारी (दि.14) सकाळी हभप उमेश महाराज सुतार, रात्री हभप ज्ञानेश्वर महाराज पंढरपूर, रविवारी (दि.15) हभप नागेश महाराज मांजरे, भोंजा, रात्री हभप कृष्णा महाराज चौरे, पंढरपूर, सोमवारी (दि.16) सकाळी हभप अनिल महाराज करळे नांदूर, रात्री सचिन महाराज ढोले, संभाजीनगर, मंगळवारी (दि.17) सकाळी हभप आकाश महाराज जगताप, देवळाली, रात्री हभप पोपट महाराज कासारखेडा, बुधवारी (दि.18) सकाळी हभप बिभीषण महाराज अंदुरे, धनेगाव, रात्री हभप इंद्रजित महाराज रसाळ, गुरुवारी (दि.19) राजेभाऊ महाराज माळी, वालवड, रात्री हभप निवृत्ती महाराज इंदोरीकर यांची कीर्तन सेवा होणार आहे. शुक्रवारी (दि.20) भागवताचार्य हभप केशव महाराज उखळीकर यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद वाटप होणार आहे. गुरुवारी रात्री धनंजय जोशी मुंबई यांची संगीत अभंगवाणी व पुणे येथील हार्मोनियम अलंकार सुरेश फरताडे, तबला अलंकार हनुमंत फरतडे यांची जुगलबंदी रसिकांना पहायला मिळणार आहे. या सप्ताह दरम्यान दररोज काकडा, श्री सद्गुरु शमनाथ महाराज संगीत गाथा पारायण, सकाळी कीर्तन, महिला भजन प्रवचन, हरिपाठ, रात्री कीर्तन, हरिजागर हे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन हभप रवि महाराज, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष महादेव महाराज यांनी केले आहे.

 
Top