तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील शुक्रवार पेठ भागात शनिवारी सांयकाळी पावसात वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांना  गणरायाला आगमन दिवशी अंधाराच्या साम्राज्यास सामोरे जावे लागले. या मुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी सणासुध्दी काळात तर अखंडीत वीज पुरवठा करा, अशी मागणी  केली.

श्रीगणेश चतुर्थी आगमन पार्श्वभूमीवर सांयकाळी जोरदार पाऊस सुरु झाल्याने याचा फटका आगमन मिरवणुकांना बसला. शुक्रवार पेठ भागातील विद्युत खंडीत होवुन शुक्रवार पेठ अंधाराच्या साम्राज्यात बुडल्याने प्रतिष्ठापीत गणेश मंडपात पणती उजेडात श्रीगणेश मुर्ती ठेवावी लागल्यामुळे गणेश भक्तांमध्ये तीव्र  संताप व्यक्त केला जात होता.

 
Top