धाराशिव (प्रतिनिधी)-  भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपण मराठवाड्यातील लोक खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालो नव्हतो. कित्येक वर्ष निजामाच्या गुलामगिरीतून,  जुलमी राजवटीतून मराठवाडा जेव्हा मुक्त झाला ,तेव्हा खऱ्या अर्थाने आपण स्वतंत्र झालो असे म्हणता येईल.

त्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. तेव्हा कुठे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे या हुतात्म्यांच्या त्यागाची माहिती ठेवून त्यांच्या प्रति कृतज्ञता प्रत्येक व्यक्तीच्या मनात असली पाहिजे. असे प्रतिपादन तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून बेसिक सायन्स अँड हुमानिटी विभागाच्या विभागप्रमुख  प्रा.डॉ. उषा वडणे बोलत होत्या.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य विक्रमसिंह माने, कार्यक्रम समन्वयक प्रा. पी.एस. तांबारे, विभागप्रमुख डॉ. डी. डी. दाते, डॉ.प्रशांत कोल्हे, डॉ.सुजाता गायकवाड, प्रा. शीतल पवार, प्रा. पी.एम. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने म्हणाले की ,निजामाच्या सैन्याने रझाकारांनी मराठवाड्यातील जनतेवर मोठ्या प्रमाणावर अन्वनीत अत्याचार केले. परंतु मराठवाड्याच्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन हौतात्म्य पत्करल पण त्याविरुद्ध संघर्ष केला. त्यामुळे हा इतिहास भारतातच नाही तर जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिलेला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. 

 
Top