तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञोत्सवात मागील वर्षी प्रमाणे यंदाही मोफत भव्य महाआरोग्य शिबीर भरवावे अशी मागणी पालकमंञी प्रा. डाँ. तानाजी सावंत यांच्याकडे शिवसेना शहराध्यक्ष बापुसाहेब भोसले यांनी केली.
मागील वर्षी प्रमाणे यंदाही आरोग्य शिबीर भरविल्यास याचा राज्यातील नव्हे तर परराज्यातील कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगना, या राज्यातील शहर व तालुका जिल्हयातील देवीभक्तांना लाभ होईल. अशी मागणी निवेदन देवुन केली. यावेळी सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे, अर्जुन सांळुके, पवार अदि उपस्थितीत होते.