धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलची एकदिवशीय शैक्षणिक सहल कर्नाटक येथील बदामी या ऐतिहासिक पर्यटन स्थळी आयोजित करण्यात आली होती .या प्रवासा दरम्यान महात्मा बसवेश्वरच्या पावन स्पर्शाने पवित्र असलेल्या कुंडल संगम येथील श्री .विनायक उच्च प्राथमिक विद्यालयात भोसले हायस्कूलचे पर्यवेक्षक तथा सहल विभाग प्रमुख धनंजय देशमुख यांनी येथील मुख्याध्यापकांशी संवाद साधून तेथील विद्यार्थी , शिक्षक यांचा प्रशालेच्या विद्यार्थ्यांचा संवाद घडवून आणला यातून तेथील शिक्षण पद्धती बरोबरच कर्नाटकी संस्कृती व भाषेबद्दल ज्ञान मुलांना यातून प्राप्त झाले .
भारतासारख्या बहुभाषिक व विविध प्रकारचे सांस्कृतिक विविधता लाभलेल्या गोष्टीचे दर्शन मुलांना व्हावे , या प्रमुख उद्देशाने अशा सहली आयोजित करून त्यांची अनुभवसंपदा वाढविणे व आपल्या देशाबद्दल त्यांच्या मनात राष्ट्रभक्ती ,राष्ट्रप्रेम निर्माण करणे हा प्रमुख हेतू या सहलीचा असल्यामुळेच या
प्रशालेत चालणाऱ्या विविध शैक्षणिक कामकाजाबद्दल श्री . विनायक उच्च प्राथमिकच्या मुख्याध्यापकांनी माहिती दिली.
यावेळी पर्यवेक्षक धनंजय देशमुख व सूर्यकांत पाटील, नितीन कदम,अजित माने, बी.टी. गवळी, ए. व्ही. शेंडगे, एस.एस. मोहिते, पी. आर. गावीत, श्रीमती पी. डी. परतापुरे, श्रीमती एस. एम.राऊत, श्रीमती पी.पी म्हैत्रे उपस्थित होते.