तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथे जुने बस स्टँन्ड तुळजापूर येथील चालु कामाचे बांधकाम परवाना व मंजुर प्लान मिळणे बाबत माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 3 अन्वये माहिती मागितली असता जुने बस स्टॅन्ड तुळजापूर येथील चालु कामाचे बांधकाम परवानाची मागणी नगरपरिषदकडे केली असता या विभागातील उपलब्ध कागदपत्रानुसार जुने बस स्टँन्ड तुळजापूर येथील बांधकामा बाबत रितसर परवानगी घेतल्याचे दिसुन येत नाही. असा पञ नगर परिषद जनमाहिती अधिकारी यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे.
या परवाना प्रकरणी आगार व्यवस्थापक, राज्य परिवहन महामंडळ, तुळजापूर यांना येथील जुने बस स्टँन्ड मध्ये इमारतीचे बांधकाम चालु असल्याचे निदर्शनास आले आहे. संदर्भीय पत्रान्वये आपणाकडून सदर इमारतीचे बांधकाम परवानगी घेतली आहे किंवा कसे व सदर जागेचे मालमत्ता सिध्द करणारी कागदपत्रे, बांधकाम परवाना बांधकाम परवान्याचा नकाशा, ई. कागदपत्रे या कार्यालयास सादर करणे बाबत कळविले होते. तरी अद्याप आपल्याकडून सदर इमारतीचे बांधकाम परवाना, नकाशा ई. कागदपत्रे या कार्यालयास प्राप्त नाही. तरी सदर बांधकाम हे तात्काळ थांबविण्यात यावे. अन्यथा नगर परिषदे मार्फत कार्यवाही करण्यात येईल.असा इषारा आगार प्रमुखांना मुख्याधिकारी नगरपरीषद तुळजापूर यांनी पञ देवुन दिला आहे.यामुळे खळबळ उडाली आहे.