नळदुर्ग (प्रतिनिधी)-  नळदुर्ग परीसरात पुन्हा एकदा चक्री जुगार सुरु झाला असुन पोलिसांनी तात्काळ कारवाई करून अनेकांचे संसार तसेच घरे उध्वस्त करणारा चक्री जुगार बंद करून हा चक्री जुगार सुरु करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

चक्री जुगारामुळे अनेकांचे संसार व घरे उध्वस्त झाली आहेत. या चक्री जुगारामध्ये चक्री जुगार सुरु करणारा मालामाल तर हा जुगार खेळणारे अक्षरशा कंगाल होतात. हा चक्री जुगार बंद करण्याची मागणी जोर धरल्यानंतर पोलिसांनी नळदुर्ग पोलिस ठाणा हद्दीतुन चक्री जुगार हद्दपार केला होता. मात्र आज पुन्हा हा चक्री जुगार हळुहळु पाय पसरत आहे. सध्या जळकोट येथे खुलेआम चक्री जुगार सुरु आहे. हा चक्री जुगार पुन्हा कसा काय सुरु झाला? हा चक्री जुगार सुरु करण्याची परवानगी कोणी दिली? याची चौकशी होणे गरजेचे आहे. आज युवक या चक्री जुगाराच्या आहारी जाऊन आपले नुकसान करून घेत आहेत. नळदुर्ग शहरातही चक्री जुगार सुरु करण्याच्या हलचाली सुरु आहेत. पोलिसांनी चक्री जुगार चालकांच्या मुसक्या अवळणे गरजेचे आहे. त्याचबरोबर चक्री जुगाराचे ठिकाण हे वाद होण्याचे मुळ ठिकाण आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने ज्याठिकाणी चक्री जुगार सुरु आहे त्याठिकाणी जाऊन तो बंद करून ज्यांनी हा जुगार सुरु केला आहे त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

 
Top