धाराशिव (प्रतिनिधी)- श्रावणमासा निमित्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी प्रमाणे यावर्षीही महिलांसाठी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्यावतीने देवस्थान दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली होती. धाराशिव तालुक्यातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यानंतर खास तुळजापूर तालुक्यासाठी पुन्हा एकदा याच सहलीचे नियोजन करण्यात आले. महिलांच्या विनंतीवरून पुन्हा एकदा श्री सप्तश्रृंगी गड, रेणुका माता, आणि नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे दर्शन सहल आयोजित करण्यात आली. यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्रावण मासानिमित्त आयोजित केलेल्या या सहलीमध्ये बहुसंख्य महिला सहभागी झाल्या होत्या .

प्रत्येकीच्या मनामध्ये सहली विषयी असलेली ओढ आणि कौटुंबिक अनेक जबाबदारीच्या कारणामुळे महिलांना कुठलीच सहल शक्य होत नाही. त्यामुळे सहलीच्या आयोजनासाठी महिला सतत विचारत असून, त्या प्रेरणेतूनच इतक्या मोठ्या संख्येत महिला असलेली  ट्रिप सुरू झाली. असे विचार यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी बोलून दाखविले. त्यामुळेच प्रत्येक सहलीत प्रत्येक महिलेने मनमुराद आनंद लुटला.

तुळजापूर येथून दिनांक 30 सप्टेंबर रोजी पहाटे निघालेल्या या सहलीला सुद्धा महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जागोजागी प्रेक्षणीय स्थळांना भेट देत निघालेली ही सहल दुसऱ्या दिवशी उशिरा पुन्हा तुळजापूर मध्ये पोहोचली. यावेळी तुळजापूर तालुक्यातील प्रमुख पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महिलांच्या इच्छाशक्तीचा विचार करून श्रावण महिन्यानिमित्त यावेळी तुळजापूर तालुक्यातील भाविक महिलांना श्री सप्तृंगी गड वणी, चांदवड येथील रेणुका माता, नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली होती. यासाठी 8 बसेसची सोय करण्यात आली. श्री सप्तृंगी गड नाशिक पासुन 60 कि.मी अंतरावर कळवण तालुक्यात आहे. देवीचे मंदिर 7 शिखरांनी वेढलेले असुन समुद्रसपाटीपासुन 4659 फुट उंचीवर आहे. यास महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी ‌‘'अर्ध शक्तीपीठ” मानले जाते.

यावेळी बोलताना अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, बहुतेक आपल्या भागामध्ये महिलांच्या आवडीनिवडीचा विचार केला जात नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सहलीला जाण्याचा प्रश्नच येत नाही. प्रत्येक महिला अनेक अडचणींनी, प्रापंचिक जबाबदारी मुळे स्वतःसाठी वेळ देऊ शकत नाही .पण या सहलीनिमित्त महिला एकत्र येतात .एकमेकींच्या सुखदुःखांची देवाण-घेवाण होते. स्वतःच्या घराला , दुःखाला क्षणभर विसरून त्या दिवसभर जेव्हा सहलीमध्ये आनंद लुटतात तेव्हा नकळतपणे मला स्वतःलाही आनंद होतो. आणि पुन्हा पुन्हा अशा सहली काढाव्यात ही भावना मनामध्ये निर्माण होते. त्यामुळे सातत्यपूर्ण अशा सहलीचे नियोजन केले असून यामधून महिलांना आनंदित पाहणे हाच आपला एकमेव उद्देश आहे. त्यामुळे यंदाच्या  या ट्रीपला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आम्ही स्वतः सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात महिला घेतल्यामुळे सांशक होतो की महिला कसा प्रतिसाद देतील, परंतु महिलांनी इतका सुंदर या सहलीचा आनंद लुटला कुठल्याही प्रकारे गालबोट न लागता निर्विघ्नपणे महिलांना सुखरूप घरी सोडल्याचे माझ्या मनामध्ये समाधान आहे.

या सहलीमध्ये सहभागी झालेल्या महिलांनीही अर्चनाताई च्या माध्यमातून आपल्याला सहलीचा पहिल्यांदाच आनंद घेता आला व आपण सहल कशी असते हे पाहिल्याचे जाणीवपूर्वक नमूद केले. यावेळी देवस्थान प्रशासनाच्या वतीने सौ. अर्चनाताई पाटील यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.


 
Top