भूम (प्रतिनिधी )-मुंबई मातोश्री या निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भूम परांडा वाशी विधानसभेची आढावा बैठक संपन्न झाली. भूम-परंडा-वाशी हा मतदारसंघ पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये शिवसैनिकांनी वज्रमुठ बांधून इतर घटक पक्षांना सोबत घेऊन आपला उमेदवार लोकसभेच्या मताधिक्यापेक्षा जास्त मतांनी विजयी करण्यासाठी जोमाने कामाला लागावे. असे आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पदाधिकारी यांना केले.
हिंदु ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचाराने प्रेरित झालेला हा मतदार संघ असून, पुढील कार्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या. या बैठकीसाठी धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, कळंब धाराशिव शिवसेनाचे आमदार कैलास पाटील, सहसंपर्क प्रमूख शंकरराव बोरकर,मकरंद राजे निंबाळकर, जिल्हाप्रमुख रणजीत पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा युवा सेना जिल्हाप्रमुख डॉ.चेतन बोराडे, प्रदीप बप्पा मेटे,वाशी तालुकाप्रमुख विकास मोलवणे, भूम तालुका प्रमुख श्रीनिवास जाधवर, परंडा तालुकाप्रमुख मेघराज पाटील, समन्वयक दिलीप शाळू महाराज, विधानसभा युवा अधिकारी प्रल्हाद आडागळे, शहर प्रमुख प्रकाश आखरे, अनिल गवारे, राईस मुजावर आदी उपस्थित होते.