धाराशिव (प्रतिनिधी)- आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य युवराज नळे यांच्या संकल्पनेतून भाजप व काही क्रीडा असोसिएशन यांच्यातर्फे मुली, महिलांसाठी 'निर्भय बनो' मोफत कराटे प्रशिक्षणाची सुरूवात आई तुळजाभवानी स्टेडियम येथील सभागृहात करण्यात आली. 

पडत्या पावसाला सुद्धा न जुमानता पहिल्या दिवशी साठ मुली महिलांनी स्वसंरक्षणाची खुणगाठ बांधली. पावणे दोनशे पर्यंत मुली महिलांनी या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केली आहे. सक्षम व सकस समाज निर्माण करण्यासाठी व कसल्याही आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता या प्रशिक्षणातून निर्माण होणार आहे, त्यामुळे संपूर्ण दोन महिने सर्व प्रशिक्षणार्थींनी दिलेल्या सूचनांनुसार प्रशिक्षण आत्मसात करावे असे आवाहन केले. याला सर्वांनीच भरभरून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रशिक्षण दरम्यान पोलिस निरीक्षक थोरात साहेब, क्रीडा अधिकारी डिंपल ठाकरे, अजिंक्य वराळे, राजसिंह राजेनिंबाळकर, योगेश थोरबोले, वर्षा नळे यांनी भेट दिली. यावेळी प्रशिक्षक हरिदास रोकडे, राजेश महाजन, वैष्णवी सरडे, ऋतुजा खरे, योगिनी फुगारे, बुशरा तांबोळी व पालक उपस्थित होते.

 
Top