धाराशिव (प्रतिनिधी)-  तालुक्यातील रुईभर येथील चहाचे हॉटेल व्यवसायिक विठ्ठल पवार यांचे पुत्र डॉ.संदीप विठ्ठल पवार व अभियंता प्रदीप विठ्ठल पवार यांनी शेक्षणिक प्रगती करुन तरुणासमोर आदर्श निर्माण केल्याबद्दल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्ह्याचे नेते संजय निंबाळकर व जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी रुईभरमध्ये जावून सोमवारी (दि.23) सत्कार केला. अभियंता प्रदिप पवार यांची शासकीय अधिकारीपदी निवड झाली आहे. तर डॉ. संदीप पवार यांचे एमबीबीएस (तृतीय) वर्षात आहेत. याबद्दल या पिता-पुत्रांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी गावचे सरपंच सुधीर गव्हाणे, उपसरपंच संतोष वडवले, तात्या वडवले, शाहुराज मते, पठाण, गडकर, नाना पाडोळे, शिवाजी काकडे, औदुंबर कोळगे, मधुकर कोळी, आप्पा पडवळ, बिलाल तांबोळी, दत्ता जमदाडे, मच्छिंद्र घोडके, विठ्ठल कोळगे, बाबासाहेब भोईटे, रवि गव्हाणे, दिपक गव्हाणे, शशिकांत कोळगे, भारत शेरखाने, आबा कोळगे, अहमद तांबोळी, सचिन माळी, पप्पू कोळगे, नामदेव कोळगे आदी मोठ्या संख्येने हजर होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रणजीत वरपे यांनी केले तर आभार नानासाहेब जमदाडे यांनी मानले.

 
Top