धाराशिव (प्रतिनिधी)- मराठा आरक्षणासाठी धाराशिव जिल्ह्यात आणखी एकाने आत्महत्या केली आहे. काही दिवसापूर्वी तडवळा येथील युवकाने आरक्षणासाठी आत्महत्या केली होती. आपल्या मुलाचा नंबर आरक्षणा नसल्यामुळे सैनिकी स्कूला लागत नाही. या नैराश्यातून शिवाजी विठ्ठल निलंगे रा. पाटोदा, ता. धाराशिव यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी निलंगे यांनी एक चिठ्ठी लिहिली असून, त्यात आपली व्यथा मांडली आहे.

निलंगे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये माझ्यावर टॅक्टर व शेतीचे कर्ज जास्त झाले आहे. जमीन नापिकी आहे. माझ्या मुलाचा नंबर सैनिकी स्कूलला यादीत सर्वात शेवटी लागला. कारण पहिल्या यादीत इतर मागासवर्गीयांचे नंबर लागले. मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळेच असे झाले आहे. त्याचा विचार करून आपण आत्महत्या करीत आहोत असा चिठ्ठी उल्लेख केला आहे. आत्महत्या बाबत बेंबळी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. आत्महत्याग्रस्त परिवाराला आर्थिक मदत करावी असे प्रकारचे निवेदन तहसीलदारामार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. 

 
Top