भूम (प्रतिनिधी)- सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस भूम-परांडा-वाशी मतदारसंघात सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सर्वप्रथम थ्री अकॅडमी येथे राज्यस्तरीय खुल्या सामान्यज्ञान स्पर्धा पार पडल्या, यात जवळपास 600 हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

यानंतर, 30 गोरगरीब व गरजू कुटुंबांना किराणा किट वाटप करून त्यांचे घर अन्नधान्यांच्या राशींनी भरण्याचे काम करण्यात आले. त्यानंतर सोजर मूकबधिर शाळा, येथे खाऊ व फळ वाटप कार्यक्रम करून शाळेतील विद्यार्थ्यांप्रती स्नेह जपण्यात आला. या दोन्ही कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. नरसिंग भंडे उपस्थित होते. यानंतर भूम शहराचे ग्रामदैवत असलेल्या अलंमप्रभू मंदिरात ना.चव्हाण यांच्या उत्तम आरोग्यासाठी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.  तसेच, परांडा तालुक्यातील वडनेर येथील गोशाळेत गोमतांसाठी चारावाटप करून मुक्या जनावरांप्रति आपले संस्कार आणि संस्कृती देखील जपण्यात आली. ना. रविंद्र चव्हाण हे महराष्ट्र भाजपातील वरिष्ठ नेते असून राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागात गेल्या अडीच वर्षात त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे ते लोकप्रिय बनले आहेत. याशिवाय राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार घालवून महायुतीचे सरकार आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.  या कार्यक्रमाचे आयोजन अक्षय(अक्की)बर्वे यांनी R.C. Fans Club व जय हनुमान ग्रुप यांच्या मार्फत केले होते. या कार्यक्रमाला सोमनाथ देवकर सर यांचे मार्गदर्शन लाभले तर चेतन शाळू,धवल गांधी यांच सहकार्य लाभले. यावेळी स्वप्नील पवार, सुधाकर मारकड, अमोल टकले, सहदेव महाजन, विकास तांबे, भैया टकले, महेश मारकड, शिवाजी पवार, उमेश पवार इत्यादी होते.

 
Top