धाराशिव (प्रतिनिधी) - शिक्षण क्षेत्रातील उपक्रमशील शिक्षकांना 2024 चा कै. पवनराजे स्मृती गुण गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रम 5 सप्टेंबर 2024 रोजी शिक्षक दिनी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या कार्यालयात दुपारी तीन वाजता होणार आहे.

पुरस्कार वितरण शिक्षक नेते बाळकृष्ण तांबारे व विक्रम पाटील यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार कैलास पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागनाथ धर्माधिकारी हे असणार आहेत. तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन कै. पवनराजे स्मृती गुण गौरव पुरस्कार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

 
Top