धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर येथे रुपामाता परिवार व उद्योग समूहाच्या वतीने भाजपचे नेते तथा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांना महाराष्ट्र विधान परिषद शतक महोत्सव कार्यक्रमात राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विधान परिषदेतील “उत्कृष्ट भाषण“ पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थापक तथा भाजप प्रदेश कार्यकारीणी सदस्य ॲड. व्यंकटराव गुंड यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी कृष्णा खोरे सिंचन प्रकल्प, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा उपकेंद्रास स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा यासाठी विधिमंडळात आवाज उठविला. जेणे करून जिल्ह्यास मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी मी विधीमंडळ व विधींमंडळाच्या बाहेर मी सतत आवाज उठविला आहे. असे प्रतिपादन माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री बसवराज पाटील यांनी रुपामाता परिवाराच्या उद्योग समूहामुळे हजारो युवकांना तुळजापूर मतदारसंघात रोजगार उपलब्ध झाल्याचे सांगितले. प्रास्ताविकात आयोजक ॲड.व्यंकटराव गुंड यांनी माजी आमदार ठाकूर यांनी सभागृहात धाराशिव जिल्ह्यासाठी हक्काचे पाणी,जलयुक्त शिवार,शेतकरी कर्ज माफी, रेल्वेमार्गासाठी भरीव निधी इ. विषयांसह जिल्ह्यातील जिव्हाळ्याचे विषय प्रभावीपणे सोडविल्याचे सांगितले. सुत्रसंचालन संजय मैदर्गी तर आभार दत्ता सोनटक्के यांनी मानले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संताजी चालूक्य पाटील, जेष्ठ नेते ॲड.मिलिंद पाटिल, सुधाकर गुंड नितिन काळे, ॲड.अनिल काळे, दत्ता कुलकर्णी, रूपामाता उद्योग समुहाचे कार्यकारी संचालक ॲड.अजित गुंड, गुलचंद व्यवहारे, रामदास कोळगे, साहेबराव घुगे, प्रभाकर मुळे, दिपक आलूरे, संतोष बोबडे, राजसिंह निंबाळकर, अँड.शरद गुंड यांच्यासह धाराशिव, तुळजापूर तालुक्यातील सरपंच,उपसरपंच, रुपामाता परिवारातील संचालक,पदाधिकारी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.