धाराशिव  (प्रतिनिधी)-राष्ट्रीय स्तरावर सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या ऑल इंडिया कौमी तंजीम संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी  धाराशिव येथील धडाडीचे नेते मसूद इस्माईल शेख यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी ही निवड केली असून मुंबई येथे झालेल्या समारंभात मसूद शेख यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

नवी दिल्ली येथे मुख्यालय असलेल्या ऑल इंडिया कौमी तंजीम संघटनेची देशात सामाजिक सलोखा,  सेक्युलर चळवळीला प्रोत्साहन देऊन देशवासीयांमध्ये भाईचारा निर्माण करणारी संघटना म्हणून ओळखली जाते. या कार्यात सक्रिय योगदान देऊन संघटनेच्या ध्येय धोरणे आणि उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण कार्य करावे असे प्रदेश अध्यक्ष मूनाफ हकीम यांनी नियुक्ती पत्रात म्हटले आहे. या निवडीचे धाराशिव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सामजिक, शैक्षणिक, राजकीय व इतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत करून नूतन प्रदेश उपाध्यक्ष मसूद शेख यांना पुढील कार्यास सदिच्छा दिल्या आहेत.

 
Top