धाराशिव (प्रतिनिधी)- शिक्षण महर्षी सुभाषदादा कोळगे सहकारी पतसंस्थेचे सभासद सुभाष गणपती कदम रा.पानवाडी ता धाराशिव यांचे सुपुञ चि. पॄथ्वीराज याचा डी.वाय.
पाटील मेडिकल कॉलेज येथे एमबीबीएस साठी प्रवेश झाल्याबददल त्याचा संस्थेच्या कार्यालयात आज सोमवारी (दि 2) रोजी शाल,पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
सुभाष कदम हे संस्थेचे संस्थापक सभासद असुन त्यांनी संस्थेचे संचालक म्हणुनही कार्यभार सांभाळलेला आहे.त्यांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत सुपुञ चि. पॄथ्वीराज याचा कोल्हापुर येथील डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश मिळविण्यात यश मिळविले त्यांच्या या यशाबददल संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महाराष्ट प्रदेश सचिव व माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळ्गेे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे सभासद डॉ वसंत मुंडे, सुभाष कदम पाटील,प्रा. डॉ विलास रणसुरे,सौरभ रणसुरे, संदिप जेटीथोर, व्यवस्थापक शाम गंगावणे यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.