धाराशिव (प्रतिनिधी) - ओबीसी आरक्षणावरून राज्यात ओबीसी विरुद्ध इतर असा संघर्ष निर्माण करण्याचे काम जाणीवपूर्वक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ओबीसीचे राजकीय, शैक्षणिक व नोकरीतील आरक्षणाचे भवितव्य देखील धोक्यात आले असून एकंदरीत ओबीसींच्या आरक्षणावर बेभरवशाची तलवार लटकवलेली आहे. त्यामुळे सर्व ओबीसी समुहातील घटकांना एकत्र करून आगामी निवडणुका व इतर सर्व क्षेत्रातील आरक्षणबाबतीत ठोस भूमिका घेण्यासाठी दि.27 सप्टेंबर आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी बैठकीत महत्त्वपूर्ण रणनीती ठरविण्यात आली. दरम्यान धाराशिव जिल्हा ओबीसी समन्वय संघर्ष समिती गठीत करण्यात येणार आहे.

धाराशिव येथील जत्रा फंक्शन हॉलमध्ये  आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सांगोपांग चर्चा करून विविधांगाने ओबीसी आरक्षण वाचविण्याबाबत ठोस भूमिका घेण्यात आली. तसेच ओबीसी समन्वय संघर्ष समिती स्थापन करून याची व्याप्ती संपूर्ण जिल्ह्यातील गाव, वाडी व वस्तीपर्यंत पोहोचविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय देखील घेण्यात आला. यावेळी कुंभार समाजाचे नेते पांडुरंग कुंभार, तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, समता परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष आबासाहेब खोत, नाभिक समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने, वंजारी समाज संघटनेचे नेते पांडुरंग लाटे, गोंधळी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतिश लोंढे, वसंत राऊत, परिट समाज संघटनेचे नेते हरिदास शिंदे, तेली समाज संघटनेचे कोषाध्यक्ष महादेव मेंगले, युवक जिल्हाध्यक्ष शशिकांत बेगमपुरे, माळी समाज संघटनेचे नेते राजाभाऊ माळी, सुरेश जाधव, विलास राऊत, रामजीवन बोंदर, अच्युत पुरी, बबलू साळुंखे, दिलीप म्हेत्रे, रवी डोईफोडे, दीपक माळी, दीपक चव्हाण, औदुंबर राऊत, मच्छिंद्र बोंदर, विलास जगदाळे, नामदेव वाघमारे, प्रेमचंद गोरे, विश्वंभर मैंदाड, बाबुराव सुरवसे, साहेबराव शिंगे, रवी गोरे, अरुण बोंदर, संतोष राठोड आदींसह ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top