धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यात सोमवारपासून पावसाने हजेरी लावली आहे. मागील चार दिवसात जिल्ह्यात 52 मिमी पाऊस झाला असून, 25 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोद झाली आहे. आतापर्यंत 3 लाख 61 हजार शेतकऱ्यांनी पुर्वसुचना दिल्या आहेत. कृषी विभागाकडून पंचमाने केले जात असून, शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सष्टेंबर अखरेपर्यंत पंचनामे सुरू राहणार आहेत. 

धाराशिव जिल्ह्यात सरासरी 603 मिमी पाऊस पडतो. 26 सप्टेंबर अखेर 724 मिमी पाऊस झाला आहे. 57 महसूल मंडळापैकी 25 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. शेतशिवारात पाणी साचून आहे. काही ठिकाणी काढून ठेवलेले सोयाबीन भिजले आहे. सोयाबीन पिकासह भाजीपाल्याचेही नुकसान झाले आहे. नुकसानीमुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळावी, यासाठी प्रशासनाकडून पिकांचे पंचनामे सुरू आहेत. सप्टेंबर महिन्यात एक लाख 44 हजार हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. सप्टेंबर अखेरपर्यंत पंचनामे सुरू राहणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात सोयाबीनचे सरासरी 2 लाख 84 हजार हेक्टर क्षेत्र आहे. यंदा 4 लाख 62 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. पावसामुळे सुमारे दीड लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. 57 पैकी 25 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. 1 लाख 44 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे पंचनामे कृषी विभागाने पूर्ण केले. धाराशिव तालुक्यातील 56994, परंडा 3800, कळंब 54 हजार तर वाशी 29335 हेक्टरचा समावेश आहे.

 
Top