धाराशिव (प्रतिनिधी) -मराठा सेवा संघाचा 34 वा वर्धापन दिन धाराशिव शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ठीक नऊ वाजता मराठा सेवा संघाच्या कार्यालयावर ध्वजारोहण करण्यात आले. या वर्धापन दिनानिमित्त आजी-माजी मराठा सेवा संघाची पदाधिकारी यांचा संवाद मेळावा रायगड फंक्शन हॉल येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक मराठा सेवा संघांचे माजी प्रदेश अध्यक्ष नेताजी गोरे,विभागीय कार्याद्यक्ष आशिष पाटील,मराठा सेवा संघांचे माजी जिल्हा अध्यक्ष धर्मवीर कदम, तुषार पाटील, डी आर कदम, नंदकुमार गवारे जिल्हाध्यक्ष शिवश्री भगत साहेब जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप धस, जिल्हा कार्याध्यक्ष विजय पवार,जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष आशाताई मोरजकर, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अतुल गायकवाड, जिल्हाध्यक्ष ॲड. तानाजी चौधरी, शरद पवार,जिल्हा उपाध्यक्ष आकाश मुंढे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. जगदीश गवळी, ॲड. घनश्याम रितापुरे, बलराज रणदिवे रोहित पडवळ वीर भगतशिंग विद्यार्थी परिषद जिल्हा अध्यक्ष अक्षय मुळीक तालुका अध्यक्ष गोरख मोरजकर शिंदे सर बालाजी माळी शुभम चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी मराठा सेवा संघाच्या 34 वर्षाच्या सामाजिक कार्याचा चित्रफिती द्वारे आलेख मांडण्यात आला. उपस्थित मराठा सेवा संघाच्या जेष्ठ पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला.उपस्थित मान्यवरांनी आपले यावेळी मनोगत व्यक्त केली.