धाराशिव (प्रतिनिधी)- लोहारा तालुक्यात आणि ग्रामपंचायत ज्याच्या नावाने सातबारा आहे अशा लोकांच्या नोंदी ग्रामपंचायतने करून घेतले आहेत परंतु गेले वीस वर्षापासून परितक्त महिला नगरपंचायतच्या हद्दीत पत्र्याचे शेड मारून राहत आहे त्या महिलेला लाईट कलेक्यान नळ कलेक्शन व तिचे अतिक्रमण नियमाकुल करून तिला घरकुलाचा लाभ देण्यात यावे या मागणीसाठी अनेक वेळा निवेदने देऊन कसलीही कारवाई झालेली नाही. यामुळे फकीरा ब्रिगेड संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2 सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

निवेदनात मौजे लोहारा येथील सुरेखा बालाजी गायकवाड हे महिला गेले वीस वर्षापासून आपल्या दोन चिमुकल्या मुली घेऊन ग्रामपंचायत होती तेव्हापासून आता नगरपंचायत च्या हद्दीवर पत्र्याचे शेड मारून नगरपंचायतला घाणीचे कचरा उचलण्याचे काम करून आपला उदरनिर्वाह करीत आहे. या महिलेने माझ्या जागेची नोंद करून घ्यावी मला लाईट कनेक्शन देण्यात यावे नळ कनेक्शन देण्यात यावे व घरकुल मागणीसाठी अनेक वेळा अर्ज निवेदन दिले असून ही महिला गरीब असल्यामुळे प्रशासनाचे तिच्याकडे लक्ष देत नाही मात्र लोहारा तालुक्यात अनेक जणांना ग्रामपंचायतीने ज्यांच्या नावावर सातबारा पक्के बांधलेले घर आहे अशा व्यक्तींच्या नावे 3000 स्केअर फुट ची नोंद करून दिलेली आहे तरी या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी फकीरा ब्रिगेड संघटनेचे प्रदेश अध्यक्ष श्रीरंग सरवदे यांच्या आदेशाने सदरील महिलेला न्याय मिळेपर्यंत फकीरा ब्रिगेड धाराशिव जिल्हाध्यक्ष लक्ष्मण खंडाळे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहेत. असे निवेदन म्हटले आहे.  या निवेदनावर प्रदेश अध्यक्ष श्रीरंग सरवदे, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण खंडागळे, नागिनी थोरात ,  पिंगा बाई पाटोळे , सुरेखा गायकवाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top