धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांच्या हस्ते विधान परिषदेतील “उत्कृष्ट भाषण“ पुरस्कार मिळाल्याबद्दल भाजपा नेते तथा मा.आ. सुजितसिंह ठाकुर यांचा तुळजापूर शहरातील भगवती मंगल कार्यालयात रविवार दि. 22 सप्टेंबर रोजी रुपामाता परिवाराच्या वतीने सकाळी. 11.30 वाजता जाहीर सत्कार करण्यात येणार आहे.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बसवराज पाटील हे राहणार आहेत तर प्रमुख उपस्थिता मध्ये आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे राहतील. यावेळी भाजपाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य- पाटील, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष अँड. मिलिंद पाटील, जि.प चे मा. उपाध्यक्ष सुधाकर गुंड (गुरुजी), महाराष्ट्र प्रदेश सहकार आघाडीचे सहसंयोजक दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अनिल काळे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रामदास कोळगे, भाजपा तुळजापूर तालुकाध्यक्ष संतोष बोबडे आदींची उपस्थिती राहणार आहे. सदरील कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रुपामाता परिवाराचे संस्थापक तथा भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अँड. व्यंकटराव गुंड पाडोळीकर यांनी केले आहे.