धाराशिव (प्रतिनिधी)- पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी धाराशिव पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे यात अवैध मद्य निर्मीती-विक्री व वाहतुक यावर आळा घालण्यासाठी जिल्हाभरात दि.07.09.2024 ते दि.10.09.2024 या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात आली.
या मोहिमेदरम्यान 99 छापा कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा सुमारे 3,790 लिटर रासायनिक द्रव, 2,563 लिटर गावठी दारु, 2,683 लिटर सिंधी, ताडी अम्ली द्रव व देशी- विदेशी दारुच्या एकुण 1002 बाटल्या असे एकुण 9,036 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव, गावठी हातभट्टी दारु, सिंधी ताडी, देशी विदेशी दारुच्या बाटल्या असे मद्य जप्त केले. असुन त्यांची एकत्रीत किंमत 7 लाख 14 हजार 100 रूपये किंमतीचा मद्यसाठा जप्त केला. यावर पथकाने मिळुन आलेल्या नमूद गावठी दारु निर्मीतीच्या द्रव पदार्थातील काही द्रव व गावठी दारुमधील काही दारु काढून घेउन ते न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्याकरीता जप्त केली. तसेच जिल्हाभरात 99 छापे घालून महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक सजंय जाधव व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या आदेशावरुन जिल्ह्यातील पोलीस ठाणे येथील अधिकारी व अमंलदार यांचे पथकाने केली आहे.