तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर शहरात आपल्या लाडक्या गणरायाला मंगळवारी वाजत गाजत आणि जल्लोषपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.
बाल गणेश मंडळानी चार चाकी गाड्यावर स्पिकर लावुन वाजत गाजत,आरगज्याची उधळण करीत मिरवणूक काढल्या. बहुतांशी सार्वजनिक गणेश मंडळांनी यापुर्वीच विसर्जन मिरवणुका काढल्याने त्यांनी साधैपणाने विसर्जन केले. राजा कंपनी गणेश मंडळाने विसर्जन मिरवणूक काढली. घरगुती गणपतींचे विसर्जन सांयकाळी पाचुंदा, तडवळा येथील तलांवामध्ये करण्यात आले.
येथील रणसम्राट गणेश मंडळाने काढलेल्या विसर्जन मिरवणुकीचा आरंभ महंत वाकोजीबुवांचा हस्ते आरती करुन करण्यात आला. या मिरवणूकित मुलींच्या अत्याचार वरील देखावा लक्षवेधणारा ठरला.