धाराशिव (प्रतिनिधी)- गवळी गल्लीतील श्री बाल हनुमान गणेश मंडळ धाराशिवचा  महाराजा  मानाचा गणपती  गणल्या गेलेल्या मंडळातर्फे शासकीय महिला रुग्णालयांमध्ये बालिका जन्मोत्सव जल्लोषात साजरा .मातांच्या व स्त्री बाळांच्या सन्मानने ,स्त्री भ्रूण हत्या रोखा, मुली वाचवा मुली शिकवा, या जय घोषात साजरा केला गेला. 

गणेशोत्सवातील लक्ष्मी आल्यापासून ते लक्ष्मी जाईपर्यंत या तीन दिवसाच्या कालावधीत शासकीय रुग्णालयांमध्ये ज्या मातांना पूर्वी मुली होत्या व आज मुलगी झाली आहे. अशा सर्व मातांनी स्त्रीत्वाचे बाळ स्वीकारले बाळांचा सन्मान, डॉक्टर पाटील मेट्रन्स महादेवी लोहार, डॉ. राजेश भिसे ,गोस्वामी, सिस्टर इतर त्यांचे सर्व सहकारी यांच्या उपस्थितीत चित्रलेखा दिवटे, सुरेखा हुच्चे, सौ नम्रता, सौ.साखरे सौ खांडेकर  जोत्सना व कीतिॅ दिवटे इतर महिला मंडळाच्या वतीने या मातांच्या व मुलींचा सन्मान करताना डॉ. पाटील म्हणाल्या मंडळाचे कार्य 60 वर्ष अखंडपणे चालणे, बालविवाह रोखणे, बालनाटिका सादर करणे व मुलींचा स्वीकार केलेल्या मातांचा बाळाचा सर्वांचा सन्मान हाच समाज व देशाचा सन्मान, हिंदवी स्वराज्याचा निर्माता जिजाऊ माता यांचा आदर्श स्त्रियांचा सन्मान याचमुळे भारत देशात संस्कृती  ,संस्कार निर्माण झाले व वाढले. तेरा मुली व मातांचा सन्मान बाळासह अंगडे  ,टोपडे  स्टील चमचा, स्टील वाटी ,फुलपात्र व झंपर पीस मंडळाच्या श्री ची प्रतिमा व मंडळाचा शेला देऊन सन्मान करण्यात आला. सौ.वृंदावनी  या मातेने सर्वांच्या वतीने आपले मत व्यक्त करताना आम्हाला दुःख नाही. आनंद आहे. मुलगा मुलगी असा भेद मानत नाही .आज सर्वात जास्त मुली शिक्षण घेऊन उच्च पदावर कार्यरत आहेत .मुलगा हवा असे ज्या मातेला वाटत असते, त्यांचा उदासपणा घालवण्याचे कार्य मंडळांनी केले. धाराशिव शहरांमध्ये विविध प्रकारच्या महिलांच्या जनजागृतीसाठी ,सक्षमीकरणासाठी विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करणारे मंडळ आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतासाठी काशिनाथ दिवटे, डॉ.अजित नायगावकर ,मनमत पाळणे, प्रा. गजानन गवळी  मनोज अंजिखाणे, विद्या साखरे, युवराज हुच्चे ,अतुल ढोकर दुर्गेश दिवटे बसवेश्वर पाळणे, एडवोकेट अमोल दिवटे   मुझे मिल पठाण  इत्यादी परिश्रम घेतले. प्रा भालचंद्र हुच्चे यांनी प्रास्ताविक व संचलन केले. डॉ.नायगावकर यांनी आभार मानले. स्त्रीभ्रूणहत्या रोखा, जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाशी उद्धारी असा संदेश मंडळाच्या वतीने व आंतरराष्ट्रीय भरडधान्य पौष्टिक आहे विविध प्रकारच्या घोषवाक्याचे पॉम्पलेट 

दवाखान्यातील नातेवाईक व माता भगिनी  रुग्णांना वाटप महिलासक्षमीकरण,सबलीकरण,स्वसंरक्षणार्थ  लाठी काठी मोफत प्रशिक्षण सुरू केले  , महिलातील विविध सूक्त कलागुणाला विकसित करण्यासाठी गौरी गणपती या उत्सवाच्या दरम्यान विविध कला सादर करून महिलांनी एक आगळावेगळा ठसा या कार्यक्रमातून समाज प्रबोधन महिलांच्या कर्तुत्वाला संधी या रंगमंचकांनी उपलब्ध करून दिली आहे डॉक्टर पाटील मॅडम यांनी मला दोन मुली आहेत माझे पती डॉक्टर आहेत मी एक मुलगी झाल्यानंतर गर्भ राहिला त्यावेळेस मी अनेक तपासण्या करून मुलाचा गर्भ नसेल तर त्या मी डावले असते पण तपासणी केली नाही व कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये शंका येऊ दिली नाही.गोस्वामी मॅडम यांनी  कविता सादर करून  ,मला दोन मुले  आहेत मुलगी नाही हे दुःख सांगून महिलांची मानसिकतेला बळ दिले .यांच्या मनोगताने समारोप झाला.

 
Top