तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेत्र तुळजापूर येथे आठवडा गुरुवार किंवा शनिवारी रोजी भरवावा अशी मागणी आठवडा बाजार करणाऱ्या व्यापारी वर्गाने मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन केलो आहे

तुळजापूरचा आठवडा बाजार मंगळवारी भरत होता भाविकांची बाजारकरुची एकच गर्दी होत असल्याने मंगळवार एवजी बुधवारी भरवण्याचा निर्णय घेतला  गेला. या बाबतीत भोंगा फिरवून सुचना दिल्या. पण बदलल्या वारा दिवशी बुधवारी पण याच दिवशी याच परिसरात चार  मोठे बाजार भरत असल्याने येथील बुधवारी भरणारा आठवडा बाजार गुरुवार किंवा शनिवारी भरवावा म्हणजे  व्यापारी वर्गाची गैरसोय होवुन अर्थिक नुकसान होणार नाही. तुळजापूरचा आठवडा बाजार गुरुवार किंवा शनिवार भरवावा अशी मागणी बाजारात व्यवासायास येणाऱ्या पन्नास व्यापाऱ्यानी मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन केली. यावर भिमाशंकर कोराळे, दत्ता बोधले, महादेव गोरे, रामलिंग गाबणे सह पन्नास व्यापाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


आठवडा बाजाराची गत एक ना धड बाराभर चिंधड्या 

नगर परिषदने आठवडा बाजार वार बदलणे निर्णय घेताना  बाजार संबधित  व्यापारी वर्ग व अन्य मंडळीशी चर्चा करणे गरजेचे होते. पण ते झाले नसल्याचे दिसुन येते. त्यामुळे सध्या आठवडा बाजाराच्या वारा बाबतीत  एक ना धड बाराभर चिंधड्या अशी बनली आहे.


 
Top