तुळजापूर (प्रतिनिधी) - तिर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील काही सार्वजनिक गणेश मंडळे अनावश्यक खर्चाला फाटा देत रक्तदान, अन्नदान, अनाथांना अर्थिक मदती सारखे समाजपयोगी उपक्रम घेऊन श्रीगणेश उत्सव साजरा करीत असल्याने  यंदाच्या सार्वजनिक उत्सवाला माणुसकी व सामाजिकतेची झालर प्राप्त करुन दिली.

तिर्थक्षेञ तुळजापूर येथे वर्गणी सक्ती व डाँल्बीच्या दणदणाटमुळे व्यापारी, शहरवासिय वैतागले असताना काही मोजके गणेश मंडळांनी वर्गणीमुक्त उत्सव, मुस्लीम बांधव, महिलांच्या हस्ते श्रीगणेश आरती, अनाथांना मदत, रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपन, शैक्षणिक साहित्य वाटप  उपक्रम घेवुन गणेश उत्सव साजरा करीत असल्याने हा बदल दिलासादायक आहे. यंदा आकर्षक मराठवाड्यात सर्वाधिक उंच गणेश मुर्ति प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

यंदा महिला वर्गानी महालक्ष्मीगौरी समोर आकर्षक असे चल देखावे सादर करुन गणेश मंडळांनी चल देखावे न  करण्याची कसर भरुन काढली. भजन किर्तन, प्रवचन विविध स्पर्धा घेतल्या जात आहे. होममिनीस्टर सारखे कार्यक्रम गल्लोगलीत होत आहेत. आजपर्यत शहरातील तुळजापूर खुर्द येथील जयशिवाजी महात्मा फुले युवा मंच, तुळजाई गणेश मंडख, शिवगणेश मंडळ अनेक मंडळांनी  रक्तदान शिबीर घेवुन चारशेच्या आसपास  रक्त बाटल्या संकलन करुन अनेकांना जीवनदान देत आहेत. तर शहरातील कानाकोप-याती लहान पासुन मोठ्या गणेश मंडळांनी मोठ्या प्रमाणात अन्नदान करीत असुन मागील आठ दिवसात दहा ते पंधरा हजार भाविकांसह गोरगरीबांनी याचा लाभ घेतला असुन गणेशोत्सवात एक ही भाविक न जेवता तिर्थक्षेञ  तुळजापूर  येथुन गेला नाही.

 
Top