धाराशिव (प्रतिनिधी)- आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के.टी.पाटील संगणकशास्त्र महाविद्यालय आणि कॉमर्स महाविद्यालयात यांच्या वतीने गुरुवर्य के.टी.पाटील सरांच्या जयंती निमित्त “एक पेड के.टी.पाटील सर के नाम“ हा उपक्रम महाविद्यालय तर्फे राबविला गेला. के. टी.पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स आणि कॉमर्स महाविद्यालयाच्या वतीने संस्थेच्या विविध शाखा परिसरात 111 वृक्षारोपण लागवड उपक्रम घेण्यात आला.

तरी संस्थेच्या विविध शाखा परिसरात प्रति शाखा 11 वृक्ष लागवड करण्यात आली. प्रथम के.टी. पाटील कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स व फार्मसी महाविद्यालय सिद्धार्थ नगर धाराशिव परिसरात वृक्षारोपण झाले. त्याच्यानंतर नूतन प्राथमिक विद्यालय तांबरी विभाग धाराशिव परिसरात वृक्षरोपण झाले त्या नंतर श्रीपतराव भोसले हायस्कूल तांबरी विभाग धाराशिव परिसरात वृक्षारोपण झाले. त्यानंतर डी फार्मसी इन्स्टिट्यूट उंबरे कोठा, धाराशिव परिसरात वृक्षारोपण झाले. त्यानंतर के.टी. पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग महाविद्यालय जाधववाडी रोड परिसर व फ्लॅयिंग किड्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल, जाधववाडी रोड परिसर धाराशिव येथे वृक्षारोपण झाले. शेवटी प्रेमाताई पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोडगाव तालुका बार्शी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

अशाप्रकारे विविध शाखा परिसरात 111 वृक्षारोपण व्यवस्थित रित्या पार पडले असून संसथेचे अध्यक्ष सुधीर के पाटील, सरचिटणीस  प्रेमाताई पाटील संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील यांनी कॉम्पुटर सायन्सचे प्राचार्य डॉ.अजित मसलेकर, त्यांचे सर्व स्टाफ यांचे अभिनंदन केले आहे. या वेळी विविध शाखा परिसरात विविध शाखेचे प्राचार्य, स्टाफ व विध्यार्थी उपस्थित होते.

 
Top