तुळजापूर (प्रतिनिधी)- यंदा विधानसभा निवडणुक व पाऊसकाळ समाधानकारक झाल्याने यंदा श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ महोत्सवात नऊ दिवस व पोर्णिमा दिनी देविदर्शनार्थ भाविक मोठ्या संखेने दाखल होण्याची शक्यता आहे.
ङी तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञोत्सवात विधानसभा निवडणूक आचार संहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी उमेदवार देवदर्शन घडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. श्री तुळजाभवानी मातेच्या भक्तात सर्वजातीधर्माचे लोक असल्याने इच्छूक उमेदवार मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी देवदर्शन हा फंडा वापरणार. विशेष म्हणजे कमी खर्चाचा हा प्रचार असल्याने याला सर्वच उमेदवार प्राधान्य देणार. विशेष म्हणजे संपुर्ण महाराष्ट्रातील सर्वच पक्षाचे उमेदवार हा फंडा वापरण्यास प्राधान्य देणार. तसेच यंदा पाऊसकाळ चांगला झाल्याने ग्रामीण भागातील भक्त ही मोठ्या संखेने देवीदर्शनार्थ येणार नाही. त्यामुळे यंदा मतदार राजा व ग्रामीण भागातील मंडळी शारदीय नवराञोत्सवात दर्शनार्थ प्रचंड गर्दी होणार आहे.