तुळजापूर (प्रतिनिधी) -   तुळजापूर शहरात व तालुक्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालु असुन पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. तरी हे अवैध धंदे तात्काळ बंद न केल्यास भष्ट्राचार निर्मुर्लन समिती वतीने 23 ऑक्टोबर 2024 पोलिस स्टेशन समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा भष्ट्राचार निमुर्लन समितीने पोलिस अधिक्षीक व पोलिस निरक्षक यांना स्मरण पञ देऊन दिला आहे.

तुळजापूर तालुक्यात व शहरात मोठ्या प्रमाणात मटका, अवैध गांजा, शिंदी, हातभट्टी, वेश्या व्यवसाय, ऑनलाईन चक्रीगेम आदी अवैध धंदे प्रमाण वाढत आहे. याला युवक व सर्वसामान्य व्यक्ती त्यास बळी पडत आहे. पोलिस प्रशासनाने  शहर व  तालुक्यातील वेश्या व्यवसाय व शहरातील मटका, चक्री, गांजा विक्री, हातभट्टी, शिंदी निर्बंध  घालुन ते बंद करावे. अन्यथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीच्या वतीने दि. 23 ऑक्टोबर 2024 पोलीस स्टेशन तुळजापूर कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. याच्या प्रत आयुक्त, आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर, उपविभागीय अधिकारी तुळजापूर यांना सादर केल्याची माहीती तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत जाधव  यांनी दिली.


 
Top