तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे जागतिक पर्यटन दिनानिमित्त हेरिटेज वॉकचे आयोजन 27 सप्टेंबरला करण्यात आले होते.याला चांगला प्रतिसाद मिळाला.

पर्यटन विकास समिती धाराशिव, पुरातत्व विभाग, तेर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने  जागतिक पर्यटन दिनानिमित्त हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितानी त्रिविक्रम मंदिर, उत्तरेश्वर मंदिर, तिर्थकुंड, चैत्यगृह, कै.रामलिंगप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालयास भेट देऊन पाहणी करून माहीती जाणून घेतली. तेर गावचा पुरातन ऐतिहासिक वारसा सर्वांना माहीती व्हायला हवा यासाठी प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष युवराज नळे, सचिव देविदास पाठक यांनी केले. हेरीटेज वॉकमध्ये  पर्यटन विकास समितीचे रणजित रणदिवे, गणेश वाघमारे, अब्दुल लतिफ, प्रा.अभिमान हंगरगेकर, बाबासाहेब गुळीग, विजय गायकवाड, डॉ.रविराज गायकवाड, बाबासाहेब घेवारे, रविंद्र शिंदे,तेरचे उपसरपंच श्रीमंत फंड, रामा कोळी, हनुमंत कोळपे, विजयकुमार इंगळे, एम.एम.शितोळे, एम.एल.कांबळे, प्रा.प्रदिप कोकाटे, प्रा.दयानंद फंड, मेघा राऊत, भाग्यश्री बिराजदार, किसन काळे, विवेक उबाळे, अमोल सावंत, नरहरी बडवे, गोरख माळी, राहुल गायकवाड, विकास भोरे, सुमेध वाघमारे व विद्यार्थी, विद्यार्थीनी सहभागी झाले होते.

 
Top