नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग बसस्थानकात सर्वत्र चिखल आणि पावसाचे पाणी थांबल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आण्णासाहेब दराडे यांनी चक्क बसस्थानकातील चिखलात बसुन महामंडळं प्रशासनाचा जाहीर निषेध केला आहे.

पावसाळ्यात नळदुर्ग बसस्थानकाची अवस्था अतिशय वाईट असते. बसस्थानक परीसरात सर्वत्र मोठ्या प्रमाणात चिखल आणि पावसाचे पाणी थांबलेले असते. या चिखलातुन वाट काढत प्रवाशांना बस पकडावी लागते. यामध्ये अनेकदा प्रवाशी पाय घसरून चिखलात पडल्याच्या घटना याठिकाणी घडल्या आहेत. ही परीस्थिती आजची नाही तर हे नवीन बसस्थानक बांधल्यापासुनची आहे. महामंडळाला बसस्थानक परीसरात साधे काँक्रिटीकरण करता आले नाही. ही बाब जेंव्हा आण्णासाहेब दराडे यांच्या निदर्शनास आली तेंव्हा थेट त्यांनी राज्य परीवहण महामंडळं प्रशासनाचा निषेध करीत बसस्थानक परीसरातील  चिखलात बसुन आंदोलन केले. यावेळी दराडे यांनी महामंडळाने तात्काळ बसस्थानक परीसरात काँक्रिटीकरण करून प्रवाशांना होणारा त्रास कमी करावा अशी मागणी केली आहे.

 
Top