नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग व परिसरातील ग्रामीण भागात पोदार इंटरनॅशनल शाळेची सुरुवात म्हणजे दर्जेदार शिक्षणाचा लाभ विद्यार्थ्यांना मिळेल असे मत धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी व्यक्त केले.

सद्गुरू शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने नळदुर्ग जवळील हॉटेल दिल्ली दरबारच्या समोर पोदार शाळेची उभारणी केली जात आहे याचे भूमिपूजन संजय जाधव यांच्या हस्ते झाले. 

पोलीस प्राधिकरणाचे न्यायिक सदस्य उमाकांत मिटकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मिटकर म्हणाले की मी लहानपणापासून नळदूर्ग मध्ये राहतो पण इथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील दर्जाची शाळा अद्याप सुरू झाली नाही अनेक पालकांची मुले ही महानगरामध्ये शिक्षणाला जातात.सध्याच्या स्पर्धात्मक युगात पोदार सारख्या नावाजलेल्या व शैक्षणिक गुणवत्ता जपणाऱ्या शाळेची गरज होती.आणि आता हे स्वप्न वर्षभरात पूर्ण होऊन जून 2025 मध्ये प्रवेशाला सुरुवात होईल.

यावेळी पोदार शाळेचे प्रतिनिधी प्राचार्य श्रीकांत वारुळे यांनी पोदार शाळेची माहिती दिली. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.संतोष पवार यांनी केले. यावेळी सद्गुरु शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी नळदूर्ग व परिसरातील राजकीय,शैक्षणिक, सामाजिक चळवळीतील मान्यवर उपस्थित होते.


 
Top