धाराशिव (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय, धाराशिव  येथे ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित केला होता. सर्व मराठवाड्यामध्ये मोठ्या उत्साहात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जात आहे.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणाच्या वेळी राष्ट्रगीत गायले गेले. भारत माता की जय, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. आपले मनोगत व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष यांनी मराठवाड्याचा हा मुक्तीदिन अनेक हुतात्म्यांच्या बलिदानातून आणि शूर सत्याग्रहींच्या त्यागातून साकारला. मराठवाड्याचा हा मुक्तिसंग्राम  स्वातंत्र्य दिन आहे. त्या सर्वांचे कृतज्ञ स्मरण आज आपण सर्व करुयात असे ते म्हणाले.  यावेळी  राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्यासोबत प्रदेश सचिव सुरेश पाटील,धाराशिव शहराध्यक्ष सचिन तावडे, धाराशिव- कळंब विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे,  जिल्हा सेवा दल सेल जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव, आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष नानासाहेब पवार, माजी सैनिक सेल जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर,   महिला जिल्हा कार्याध्यक्ष अप्सरा पठाण, ओबीसी सेल जिल्हा सचिव नारायण तुरुप,धाराशिव महिला शहर अध्यक्ष सुलोचना जाधव,  सामाजिक न्याय शहराध्यक्ष डि.के कांबळे, सामाजिक न्याय जिल्हा सरचिणीस राजाभाऊ जानराव, धाराशिव महिला तालुका कार्याध्यक्ष रुक्मिणी कुंभार,धाराशिव महिला तालुका उपाध्यक्षा उषा लगाडे आदी पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.

 
Top