नळदुर्ग (प्रतिनिधी)-  नवरात्र महोत्सवात दि. 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर 2024 या कालावधीत नळदुर्ग येथील अंबाबाई मंदिरात महान तपस्वी श्री बालयोगी परमहंस महेश्वरानंद महाराज लोक कल्यानासाठी आपल्या छातीवर घटस्थापना करून अनुष्ठान करणार आहेत. दि. 21 सप्टेंबर रोजी अनुष्ठान सभामंडप उभारणीच्या कामाचे भुमीपुजन करण्यात आले.

ऐतिहासिक नळदुर्ग शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच नवरात्र महोत्सवात अशप्रकारचा अनुष्ठानाचा भव्य, दिव्य कार्यक्रम पार पडत आहे. महान तपस्वी श्री बालयोगी परमहंस महेश्वरानंद महाराज हे नवरात्रीच्या पहिल्या दिवसांपासुन ते विजया दशमी पर्यंत नळदुर्ग येथील अंबाबाई मंदिरात देवीसमोर आपल्या छातीवर घटस्थापना करून अनुष्ठान करणार आहेत. या अनुष्ठान कालावधीत संपुर्ण दहा दिवस अन्न, पाणी तसेच सर्व नैसर्गिक विधिंचा त्याग करून एकाच आसनामध्ये दहा दिवस राहुन महान तपस्वी श्री बालयोगी परमहंस महेश्वरानंद महाराज तपस्या करणार आहेत. ा सर्व कार्यक्रमाचे नियोजन नळदुर्ग सकल हिंदु समाज करीत आहे.

श्री शिवलिंगेश्वर हिरेमठाचे मठाधीपती श्री ष. ब्र. बसवराज शिवाचार्य महास्वामीजी व महान तपस्वी श्री बालयोगी परमहंस महेश्वरानंद महाराज यांच्या हस्ते ही मुहुर्त पुजा करण्यात आली. यावेळी  संजय बताले, श्रमिक पोतदार, धीमाजी घुगे, सरदारसिंग ठाकुर, संतोष पुदाले, अंबाबाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेश जाधव, संजय विठ्ठल जाधव, विलास येडगे, गणेश मोरडे, अक्षय भोई, विजय ठाकुर, अजय दासकर, ज्योती बचाटे, चंदन पुदाले, नेताजी महाबोले, राजकुमार गावडे, ओम बागल, रवी पिस्के, अंकुश जाधव, विकी डुकरे, विशाल कलशेट्टी, किरण दुस्सा व संकेत स्वामी आदिजन उपस्थित होते.

 
Top