नळदुर्ग (प्रतिनिधी)- तुळजापुर विधानसभा मतदार संघातील इच्छुक अपक्ष उमेदवार आण्णासाहेब दराडे यांनी सध्या या मतदार संघातील संभाव्य बलाढ्य व धनाड्य उमेवरांची झोप उडविली आहे. आपल्या प्रचार दौऱ्यात चित्ररथ घेऊन फिरणाऱ्या आण्णासाहेब दराडे यांना या मतदार संघातुन प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तुळजापुर विधानसभा मतदार संघात आण्णासाहेब दराडे हे कुणाचे राजकीय गणित बिघडवतात हे पाहणे गरजेचे आहे.

आण्णासाहेब दराडे हे हगलुर ता. तुळजापुर येथील रहिवासी आहेत. त्यांनी तुळजापुर विधानसभा मतदार संघातुन अपक्ष म्हणुन निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे कार्यकारीणी सदस्य अशोक जगदाळे यांच्यानंतर प्रचारामध्ये आण्णासाहेब दराडे यांनी मुसंडी मारली आहे. 10,12 गाड्यांचा लवाजमा तसेच त्यांनी तयार केलेला चित्ररथ घेऊन ते वाडी, वस्ती तांड्यावर जात आहेत. वाडी, वस्ती तांडयावरील मतदारांशी संवाद साधताना दराडे यांनी अतिशय भावनिक होऊन “परीवर्तन हवंय ना, मग बघत बसु नका,परीवर्तनाच्या लढ्यात सहभागी व्हा असे आवाहन ते मतदारांना करीत आहेत. चित्ररथाच्या माध्यमातुन त्यांनी आपला निवडणुकीतील जाहीरनामा काय आहे हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. अतिशय शिस्तबद्ध प्रचार तसेच भावनिक व लोकांच्या काळजाला भिडणारे भाषण करून आण्णासाहेब दराडे यांनी जनमत मिळविण्याचा प्रयत्न सुरु केला असुन यामध्ये त्यांना सध्यातरी बऱ्यापैकी यश प्राप्त झाले आहे. दररोज सकाळी सात वाजल्यापासुन आण्णासाहेब दराडे हे प्रचारासाठी बाहेर पडत आहेत.ते रात्री उशिरापर्यंत प्रचार करीत आहेत. कुठलीच राजकीय पार्शवभुमी नसताना तसेच अपक्ष म्हणुन निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतलेल्या आण्णासाहेब दराडे यांना तुळजापुर विधानसभा मतदार संघात सध्या जो प्रतिसाद मिळत आहे तो वाखानन्याजोगा आहे. दराडे यांना प्रत्येक गावात जो प्रतिसाद मिळत आहे ते पाहता तुळजापुर विधानसभा मतदार संघातील मतदार सर्वच राजकीय पक्षांच्या पुढऱ्यांना कंटाळले असल्याचे दिसुन येत आहे. दराडे यांनी टँकरमधुन उजनीचे पाणी आणले आहे. हे टँकर सर्वांचे लक्ष वेधुन घेत आहे. उजनीचे पाणी तालुक्यात येणार म्हणुन सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपला गळा फाटेपर्यंत अनेकदा ओरडुन सांगितले मात्र एकाही महाभागाने अद्याप उजनीचे पाणी तुळजापुर तालुक्यात आणले नाही. मात्र टँकरच्या माध्यमातुन का होईना दराडे यांनी उजनीचे पाणी तालुक्यात आणले. त्याचबरोबर निवडणुकीतील आपला जाहीरनामा त्यांनी 100 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहुन दिला असुन हेही मतदारांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदु झाले आहे. त्यामुळे रात्री उशीरपर्यंत आण्णासाहेब दराडे यांची वाट पाहत नागरीक गावात बसत आहेत हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल.निवडणुकीच्या तोंडावर देखावा करणाऱ्यांना,निवडुन आल्यानंतर पाच वर्षे गायब होणाऱ्याना,फक्त सोशल मीडीयावरचा विकास सांगणाऱ्याना,आता कायमच घरी पाठविण्याची वेळ आली आहे असे दराडे हे मतदारांना सांगत आहेत. दराडे यांना दिवसेंदिवस मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तुळजापुर विधानसभा मतदार संघात काय चमत्कार होणार का? हे पाहणे गरजेचे आहे. मात्र दराडे यांनी सध्यातरी तुळजापुर विधानसभा मतदार संघात अनेकांची झोप उडविली आहे.

 
Top