तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालयात महिला सक्षमीकरण विभाग , जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिस दिवसीय ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचा सांगता समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थिनींना कौशल्यपूर्ण शिक्षण मिळावे व आत्मनिर्भर बनावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वतीने व महिला सक्षमीकरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने सदर प्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी तसेच तुळजापूर शहरातील महिलांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या समापनाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जीवन पवार यांच्या सह जिल्हा उद्योग केंद्राचे समन्वयक पांडुरंग मोरे, महाराष्ट्र उद्योजकता विकास मंडळाचे व्यवस्थापक सूर्यवंशी, तालुका समन्वयक माधुरी मॅडम, महिला सक्षमीकरण विभागाच्या प्रमुख डॉ सी आर दापके, सदस्य डॉ.एफ.एम.तांबोळी, कनिष्ठ विभागातील सदस्य प्रा. कदम यांच्या सह सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सदर तिस दिवसीय प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन पवार यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झाले.

 
Top