धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा अधिकारी धाराशिव आयोजित जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा दि . 13 ते 19 सप्टेंबर दरम्यान प्लाईंग कीडस इंटरनॅशनल इंग्लीश  स्कूलच्या मैदानावर संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये प्रशालेतील 14, 17, 22  वयोगटातील मुले व 19 वयोगटातील मुलींचा संघ प्रतिपक्षाच्या संघाला पराभूत करून धाराशिव  जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेला पात्र  ठरले आहेत. हे संघ  धाराशिव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

या विजयी संघास क्रीडा शिक्षक विक्रम सांडसे, इंद्रजित वाले, रितेश जाधव, धीरज लोमटे, प्रज्वल इजारे  यांनी मार्गदर्शन केले. या विजयी संघाचा सत्कार संस्थेच्या वतीने सरचिटणीस प्रेमाताई पाटील यांनी केला. तर या विजयी संघास आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील, सरचिटणीस प्रेमाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपप्राचार्य संतोष घार्गे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पर्यवेक्षक राजेंद्र जाधव यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


 
Top