परंडा (प्रतिनिधी)-राष्ट्रकुल संसदीय मंडळा मार्फत विधानपरिषदेतील “उत्कृष्ट भाषण” पुरस्कार राष्ट्रपती श्रीमती द्रौपदीजी मुर्मु यांच्या हस्ते मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते परंडा येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण कार्यक्रमात माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला.
राज्याचे कुटुंबकल्याण व सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत तसेच मान्यवर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.