धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाराशिव जिल्हा दौ-यावर आले असता, धाराशिव येथील विमानतळावर अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्ना संदर्भात त्यांना निवेदन देऊन चर्चा करण्यात आली. यावेळी शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी शिष्टमंडळास दिले.
1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या सर्व कर्मचारी व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. 15 मार्च 2024 रोजीचा सुधारित संच मान्यतेचा नवीन शासन निर्णय रद्द करावा. दि. 5 सप्टेंबर 2024 रोजी काढलेला 20 पटाच्या आतील शाळेवर कंत्राटी शिक्षक भरती चा शासन निर्णय रद्द करावा. महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे 100 पटसंख्या असणाऱ्या प्रत्येक शाळेवर मुख्याध्यापक नियुक्तीचा शासन निर्णय त्वरित काढावा. सातव्या वेतन आयोगाप्रमाणे असणारी 10-20-30 अशी आश्वासित प्रगती योजना जिल्हा परिषद शिक्षकांना सरसकट लागू करावी. यासह इतर प्रश्न मांडण्यात आले.
शिष्टमंडळामध्ये अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर, राज्य नेते बशीरभाई तांबोळी, सरचिटणीस अविनाश मोकाशे,शाहू शिक्षक सोसायटीचे चेअरमन सुरेश भालेराव, महेबूब काझी, जिल्हा उपाध्यक्ष मालोजी वाघमारे, मारूती काळे, संतोष डोके, लहू जगताप, लक्ष्मण घोडके, मिलिंद धावारे, मिलिंद जानराव, राजेंद्र अकोस्कर, तालुकाध्यक्ष नागनाथ मुडबे यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.