तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी देवस्थान मध्ये कर्मचारी भरती प्रक्रिया - निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश  सोमवार दि. 9 सप्टेंबर रोजी तुळजाभवानी मंदीर प्रशासकीय कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थान  अध्यक्ष सचिन ओम्बासे च्या हस्ते देण्यात  आले.

यावेळी विश्वस्त तथा तहसिलदार अरविंद बोळंगे प्रशासकीयव् यवस्थापक तथा तहसिलदार माया माने, सहायक धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले, अभियंता प्रशांत चव्हाण, आस्थापना प्रमुख जयसिंग पाटील, जनसंपर्क अधिकारी गणेश मोटे, विश्वास सातपुते अदि उपस्थितीत होते.

प्रारंभी जिल्हाधिकारी तथा श्रीतुळजाभवानी मंदीरसंस्थान अध्यक्ष डाँ. सचिन ओम्बासे यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्ती पञ दिल.  यावेळी उमेदवारांनी नियुक्ती आदेश स्विकारले. यावेळी बोलताना म्हणाले कि,  विविध प्रक्रिया होवुन आज नियुक्ती आदेश देत आहोत काही परीक्षाचे निकाल येणे बाकी असल्याने दहा ते बारा जागांचा नियुक्ती आदेश निकाल येताच दिले जाणार आहेत. शारदीय नवराञ पुर्वी नियुक्ती करण्याचे नियोजन होते ते पुर्ण झाले असुन नियुक्ती आदेश दिलेल्या उमेदवारांनी सात दिवसाच्या सेवेत रुजू होणे गरजेचे आहे.

या भरती प्रक्रियामुळे श्रीतुळजाभवानी देवस्थान वर अर्थिक भार पडणार असला तरीही मंदीर प्रशासनात सुसुञता येणार असुन भाविकांना सुलभ दर्शन घडणार असल्याचे शेवटी म्हणाले. प्रारंभी प्रास्तविक प्रशासकीय व्यवस्थापक तथा तहसिलदार माया माने यांनी केले. यावेळी पञकार, निवडलेले उमेदवार त्यांचे नातेवाईक, मंदीर कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थितीत होते.


 
Top