तुळजापूर (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांचे तीन महिन्यांचे वेतन थकीत होते सध्या गौरी गणपती उत्सव सण असल्यामुळे जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन तात्काळ देणे बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शिव अल्पसंख्यांक सेनेचे जिल्हाप्रमुख अमीर शेख यांच्या हस्ते पत्र पाठवून दिले.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग यांना अमीर शेख यांनी भेटून खासदार यांचे पत्र दिले. खासदार यांनी तात्काळ कर्मचाऱ्यांची पगार देण्याची सूचना केली असले बाबतचे कळवले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आजच वेतन पगार वितरित करू असे सांगितले. तात्काळ पगार मिळणार असल्यामुळे कर्मचाऱ्यांचा सण गोड होणार असे शिव अल्पसंख्यांक सेनेचे जिल्हाप्रमुख अमीर शेख यांनी सांगितले.